Thursday, April 25, 2024
Homeनगरथंडीची चाहूल…उबदार कपड्यांची दुकाने सजली !

थंडीची चाहूल…उबदार कपड्यांची दुकाने सजली !

पारंपारिक स्वेटरसोबतच ‘टु इन वन’ प्रकारचे जॅकेटला नगरकरांची मोठी मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा पावसाळा उशिरा संपला असून आता हवेत गारवा वाढु लागल्याने गुलाबी थंडी पडायला सुरवात झाली आहे. सकाळी फिरायला जातांना गरम कपडे, फलर कान टोपीमध्ये वापरतांना नगरकर दिसू लागले आहेत, तर महिलाही फिरायला जातांना स्वेटर्स आणि स्कार्फ वगैरे गरम कपडे वापरू लागले आहेत. थंडीला सुरूवात होवू लागल्याने गरम कपड्यांच्या दुकानेही थाटली जात आहेत. नागरीकांचेही पाय या दुकानांकडे वळू लागले आहेत.
यंदा गरम कपड्यांच्या असंख्य प्रकारचे कपडे बाजारात उपलब्ध आहेत.

- Advertisement -

टु इन वन याप्रकारचे जॅकेट, स्वेटर्स, बीन बाह्यांचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट लहान मुलांसाठीचे जॉकेटस आदी प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे फलर, टोप्या, कान टोप्या कान पट्ट्या ही उपलब्ध आहेत आणि रस्त्यावर थाटलेल्या दुुकानात दरात घासाघीस करता येत असल्याने ग्राहकांची या दुकानातून गर्दी जास्त दिसते. एमआयडी परिसारातील सह्याद्री चौक, सन फार्मा चौक, नगर-पुणे रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय, नव्या तहसिलदार कचेरीजवळ, चितळे रोड या ठिकाणी रस्त्यावर उबदार कपड्याची दुकाने थाटली असून यासह शहरातील कापडबाजारात आलीशान दुकसानासह अनेक ठिकाणी कमीत कमी ते जास्त जास्त दरात उबदार कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मोठ्या माणसांचे ‘टु इन वन’ जॅकेटची किंमत 600 ते 1 हजार रुपयांपर्यंत असून महिलांचे कोट 400 ते 500 रुपयांपर्यंत तर लोकरी स्वेटर्स 250 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कहान मुलांचे जॅकेटस आणि स्वेटर्स ही 250 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदाची थंडी सुसह्य होण्यासाठी केटसुल आणि त्याला नेटेडचे खिसे असलेल्या नाईट पॅन्ट्स आणि नेटेडचे आस्तर असलेले टी शर्टस देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. थंडीपासून बचाव करण्यासाठी माकड टोपी आणि कान टोपीलाच लोकांची जास्त पसंती असते. त्याचबरोबर लोकरीच्या हात मोज्यांनाही मोठी मागणी आहे. तर महिलाही स्वेटर्स बरोबर स्कार्फची मागणी आहे.

राज्यात गेल्या काही वर्षात नगर जिल्ह्यात थंडीचा कडका वाढतांना दिसत आहे. थंडीची चाहूल लागली असून राज्यात सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद सध्या नगर जिल्ह्यात होतांना दिसत आहे. यामुळे यंदा नगरकर थंडीने चांगलेच काकडणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या