Sunday, May 5, 2024
Homeनगरस्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन स्फोट; तिघे गंभीर जखमी

स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन स्फोट; तिघे गंभीर जखमी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

मुलाकडून स्वयंपाक घरातील गॅस चालू राहिल्याने गॅस संपूर्ण घरात पसरला. त्यानंतर महिलेने गॅस सुरू करण्याचा प्रयत्न केला असता मोठा स्फोट झाल्याची घटना तालुक्यातील संवत्सर येथील कासली फाट्या नजीक असलेल्या गॅस गोदामानजीकच्या घरात घडली.

- Advertisement -

त्यात महिला रंजना सोमनाथ कवडे रा. संवत्सर व महिलेचा पती सोमनाथ कवडे, एक लहान मुलगा असे तिघे गंभीर जखमी झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात एच.पी. कंपनीची बाबासाहेब परजणे यांचे मालकीची गोपाल कृष्ण गॅस एजन्सी आहे. या गॅस कंपनीचे गोडाऊन कासली रस्त्यालगत आहे. गॅस कंपनीचे राखण करण्यासाठी सोमनाथ कवडे या इसमाची नेमणूक कारण्यात आलेली आहे.

त्यांच्या घरात पती, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. दि. ०८ ऑक्टोबरच्या रात्री नऊ वाजणेचे सुमारास सोमनाथ कवडे व त्यांची पत्नी रंजना कवडे हे काही कामासाठी बाहेर गेले असता घरातील मुलाकडून गॅसची कळ चालू राहिली. त्यातून गॅस घरभर पसरला. काही वेळाने आई व वडील घरी आले असता स्वयंपाक करण्यासाठी रंजना यांनी गॅस सुरू केला असता घरातील स्वयंपाक खोलीत गॅसचा भडका होऊन त्याचा मोठा स्फोट झाला.

त्यात रंजना कवडे या साठ टक्के तर सोमनाथ कवडे हे दहा टक्के तर एक मूल अल्पशे भाजले गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे. त्यांना ग्रामस्थांनी उपचारार्थ लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या