Wednesday, April 24, 2024
Homeनगरवादग्रस्त स्टेटस आणि ऑडिओ क्लीपमुळे दोन गटांत तणाव

वादग्रस्त स्टेटस आणि ऑडिओ क्लीपमुळे दोन गटांत तणाव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वादग्रस्त व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमुळे बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत दोन गटांत तणावपूर्ण वातावरण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखा, कोतवाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

गोपनीय शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गर्गे यांच्या फिर्यादीवरून बारातोटी कारंजा माळीवाडा येथे जमा झालेल्या व घोषणाबाजी करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार रमेश घोलप, रोहित सोनेकर, शुभम कोमाकुल, गोट्या परदेशी, यश घोरपडे, ऋषी लगड (सर्व रा. नगर) व इतर 50 ते 60 जणांविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून तख्ती दरवाजा येथे हातामध्ये दंडुके, लोखंडी रॉड घेऊन जमलेल्या मुस्लिम धर्मिय व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल गुलाम दस्तगीर, मोहसीन रफिक शेख, जमील नवाज बेग, सय्यद आवेज जाकीर उर्फ बोबो, सय्यद परवेज जाकीर (सर्व रा. तख्ती दरवाजा, नगर) व इतर सात ते आठ तरुण मुले यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार रमेश घोलप (वय 25 रा. कोतवाली पोलीस क्वार्टर शेजारी, नगर) यांनी व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवल्यामुळे त्यांना बुधवारी दुपारी सद्दाम जाकीर सय्यद (रा. मुकुंदनगर) याने फोन करून हिंदु व मुस्लीम समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. त्यांच्यामधील संभाषणाची ऑडीओ क्लीप व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रसारीत केली. यावरून घोलप याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सद्दाम जाकीर सय्यद याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या