Wednesday, April 24, 2024
Homeनगरवादग्रस्त पोस्ट नगरमध्ये तिन गुन्हे दाखल

वादग्रस्त पोस्ट नगरमध्ये तिन गुन्हे दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर टाकणार्‍या दोन इंस्टाग्राम अकाऊंटधारकांसह जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणार्‍या एका युवकाविरुद्ध भिंगार कॅम्प व तोफखाना पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सतिश ज्ञानेश्वर मोरे (रा. सौरभनगर, भिंगार) याने दिलेल्या फिर्यादीवरुन किंग शेख 786 व ईस्लाम किंग या अनोळखी इंस्टाग्राम वापरकर्त्यांवर भादवी कलम 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या दोघांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकला होता. तसेच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दुसरी फिर्याद प्रशांत विजय जगताप (वय 20, रा.माधवबाग, भिंगार) या युवकाने दिली आहे. हिंदू सेमी आरआर या अनोळखी इंस्टाग्राम अकाऊंट धारकाने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. तिसरी घटना चितळे रोडवर घडली. उत्कर्ष गिते (रा.दाळमंडई) या व्यक्तीने व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस्वर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे फोटो ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या