Thursday, April 25, 2024
Homeधुळे...तरच ठेकेदारांची बीले अदा करावीत

…तरच ठेकेदारांची बीले अदा करावीत

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शौचालयांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदार व्यवस्थीत करतो की नाही याची पाहणी अधिकार्‍यांनी

- Advertisement -

प्रत्यक्ष जावून करावी. त्यानंतरच त्यांची देयके अदा करावीत. तसेच संबंधित ठेकेदारांची दर महिन्याला बैठक घेवून त्यात नागरिकांच्या तक्रारी मांडाव्यात अशी सूचना सभापती सुनिल बैसाणे यांनी दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपायुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त विनायक कोते, नगरसचिव मनोज वाघ, भारती माळी, युवराज पाटील, अमोल मासुळे, सुनिल सोनार, कमलेश देवरे, विमलबाई पाटील, सईदबेग मिर्झा, अन्सारी फातमा, सुरेखा देवरे, मुक्तार मन्सुरी, मंगला पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी विषयपत्रिकेवरील पाच विषय मंजूर करण्यात आले तर धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी शासनाच्या मंजूर दराप्रमाणे मे. बिलकॉन कन्सल्टंन्सी औरंगाबाद यांनी आर्किटेक्ट नियुक्ती देण्यासंदर्भात विषय नामंजूर करण्यात आला. या चर्चेत अमोल मासुळे, कमलेश देवरे, युवराज पाटील यांनी सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या