Sunday, April 28, 2024
Homeनगरवीज खांबावर धक्का बसून कंत्राटी वीज कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

वीज खांबावर धक्का बसून कंत्राटी वीज कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला शिवारात वीज खांबावर जम्प टाकत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून एका कंत्राटी वीज कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्याम रामा गायकवाड (वय 21, रा. नान्नज दुमाला) असे मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. सोमवारी (दि. 10) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

- Advertisement -

नान्नज दुमाला शिवारात वीज खांबावर जम्प टाकण्यासाठी परमिट घेऊन कंत्राटी वीज कामगार श्याम गायकवाड हे वीज खांबावर चढले होते. ते जम्प टाकण्याचे काम करीत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा शॉक बसून श्याम गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच नान्नज दुमाला गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडे ग्रामस्थांनी व मयत युवकांच्या नातेवाईकांनी जबाबदार असणार्‍यावर कारवाई करण्याचे लेखी मागत मृतदेह वीज खांबावरून खाली घेण्यास विरोध केला.

दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करीत मृतदेह खांबावरून खाली घेत पंचनामा केला. त्यांनतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी सोमवारी सायंकाळपर्यंत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. यापुर्वीही वीज खांबावर काम करताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने वीज कामगारांचे मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत, मात्र कुणावरही कारवाई होत नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या