Friday, April 26, 2024
Homeनाशिकव्हॉलीबॉल खेळाची उज्ज्वल परंपरा पुढे न्या : अश्विनीकुमार येवला

व्हॉलीबॉल खेळाची उज्ज्वल परंपरा पुढे न्या : अश्विनीकुमार येवला

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक या संस्थेची एक उज्ज्वल परंपरा आहे. ती परंपरा पुढील पिढीतील खेळाडूंनी पुढे तशीच चालू ठेवत राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अश्विनीकुमार येवला यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

जु. स. रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या नवीन व्हॉलीबॉल मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड उपस्थित होते. शनिवार (दि. ६) सकाळी जु. स. रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

अश्विनीकुमार येवला यांनी आपल्या मनोगतात असे म्हणाले की, राजेश गायकवाड सारखे छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू व माजी क्रीडा शिक्षक व छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम, आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्कर्षा सोनावणे, व राष्ट्रीय खेळाडू विनोद सोनावणे, अतुल निकम, अमोल निकम, संजना जगताप, प्रांजल उगले, प्रणिता बस्ते, अपूर्वा वाघचौरे, स्नेहल घुगे, विष्णू डावखर, शीतल पुरोहित, सिद्धार्थ साबळे, रेजवान शेख यांनी संस्थेचे नाव व्हॉलीबॉल खेळात उज्ज्वल केले आहे.

याही पुढे अशीच उज्ज्वल परंपरा राहावी म्हणून संस्थेने नाशिक, नाशिकरोड, इगतपुरी, सिन्नर नांदगाव या संकुलामध्ये क्रीडाप्रबोधिनी अंतर्गत व्हॉलीबॉल खेळाची उत्तम मैदाने तयार केली आहे. तसेच संस्थेच्या वतीने जिल्हा स्तरीय शालेय विविध गटाच्या व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. अरुण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या