Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकरोनावर नव्या गाइडलाईन : कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना अनुमती

करोनावर नव्या गाइडलाईन : कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना अनुमती

दिल्ली | Delhi

देशात अनेक राज्यांमध्ये पुन्हा करोना संसर्गाचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंटेन्मेंट, सर्व्हेक्षण आणि दक्षता यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हे नियम १ ते ३१ डिसेंबपर्यंत लागू असणार आहेत.

- Advertisement -

कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासन, पोलिसांवर नियमांची योग्य अमलबजावणी करण्याची जबाबदारी असणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारांनी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी सूचना गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने पाळत, नियंत्रण ठेवणे आणि सावधगिरी बाळगण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना सक्तीने नियमांची अमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच अनेक गोष्टींसाठी नियमावली जाहीर केली असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्याही सूचना आहे.

कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची सक्ती केली जावी. याशिवाय ज्या शहरांमध्ये आठवड्यातील पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांच्या वर आहे तिथे कार्यालयीन वेळांबद्दल योजना तसंच इतर उपाययोजनांबद्दल विचार करावा जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल असंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक जिल्हा, पोलीस आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची असणार आहे. याव्यतिरिक्त, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संबंधित अधिकाऱ्यांसोबत जबाबदारी निश्चित करतील. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवल्या उपाययोजनांचं पालन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सांगितलं आहे. तसंच राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश स्थानिक परिस्थितीनुसार रात्री संचारबंदीसारखे नियम लागू करु शकतात, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना सूचित केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या