४७ रुपयांच्या श्रीखंडासाठी १६ हजार भरपाईचे आदेश

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – aurangabad

ग्राहकाने तक्रार करुनही कंपनीने या बॅचमधील उत्पादनाची विक्री थांबवली नाही. तसेच ज्या (Shrikhand) श्रीखंडाची विक्री करण्यात आली, ते परत मागविले नाही. त्यामुळे ग्राहकाने केलेल्या तक्रारीवरून (Consumer Grievance Redressal Commission) ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (Amul) अमुल आणि (Reliance Smart Mall) रिलायन्स स्मार्ट मॉलला चांगलाच दणका दिला आहे. तर या दोन्ही कंपन्यांना आता ४७ रुपयांच्या श्रीखंडासाठी १६ हजार रुपये मोजावे लागणार आहे.

नवनाथ गाडेकर यांनी ९ जून २१ रोजी रिलायन्स मॉलमधून अमुलचे श्रीखंड ४६.५० रुपयात खरेदी केले होते. घरी श्रीखंडाचे पॅक फोडल्यानंतर त्याला आतून बुरशी लागल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नवनाथ यांनी तात्काळ अमुल आणि रिलायन्सला ई-मेल (E-mail) केला आणि त्यात तक्रार दिली. मात्र त्यांच्या तक्रारीची तब्बल एक आठवड्यानंतर दखल घेण्यात आली. तसेच कंपनीने संबंधित बॅचमधील उत्पादनाची विक्री थांबवावी. अशी विनंती ग्राहकाने केली होती.

त्यावर काहीच प्रतिसाद न मिळाल्याने नवनाथ यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली होती. त्यानंतर अमुल आणि रिलायन्स मॉलने ग्राहकाला रक्कम परत करण्याची तोंडी तयारी दाखवली आणि प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केला, प्रतिवाद्यांनी अयोग्य व्यापार पद्धतीचा अवलंब केला आहे. दोन्ही प्रतिवाद्यांनी तक्रारीच्या खर्चाची आणि मानसिक त्रासापोटी उत्पादनाच्या किंमतीसह ग्राहकाला १, ०४७ रुपयांची भरपाई द्यावी तसेच ग्राहक संरक्षण निधीत दोन्ही प्रतिवाद्यांनी १५ हजार रुपये जमा करावे,असे आदेश आयोगाने दिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *