Thursday, April 25, 2024
Homeजळगावग्राहक न्यायालयाचा आदेश : यात्रेकरीता घेतलेली रक्कम व्याजासह परत करा!

ग्राहक न्यायालयाचा आदेश : यात्रेकरीता घेतलेली रक्कम व्याजासह परत करा!

पाचोरा Pachora (प्रतिनिधी)

कोरोनामुळे (Corona) नियोजित टूर्स (Tours) रद्द करावी लागली. मात्र यासाठी भरलेली रक्कम (Amount) केसरी टुर्स कंपनीने परत देण्यास नकार दिला. याबाबत ग्राहक न्यायालयात प्रवाशांतर्फे (consumer court) दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सुनावणी होत केसरी टूर्स कंपनीला सदर रक्कम परत (Refund amount) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

येथील रहिवाशी सौ.शितल संदीप महाजन (Shital Sandeep Mahajan) यांनी केसरी टुर्स च्या (Kesari Tours) जळगांव येथील एजंन्ट मार्फेत चार जणांची यात्रा (Travel) जाणेसाठी बुंकीग केली होती.या १२ दिवसाच्या यात्रे साठी चार जणांची रक्कम रू. एक लाख सत्त्यांनउ हजार चारशे केसरी टुर्सच्या जळगांव येथील एजंन्ट यांचेकडे दिनाक २०/१/२०२० रोजी रोख रक्कम देवुन तशी पावती घेतली होती.

बुकीग केल्यांनतर दोन महीन्यांनी दि.२०/३/२०२२ पासुन संपूर्ण भारतात कोवीड -१९ विषाणुच्या संसर्गजन्य आजारामुळे जगात लॉकडाउन घोषीत करण्यात आले होते. त्या नुसार केसरी टुर्स यांनी तक्रारदार शितल महाजन हीस सदरहु चारधाम यात्रा स्थगित ठेवल्या. बाबत देखील कळविण्यात आले होते. जगात कोरोना (Corona) महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तक्रारदार शितल महाजन यांना चारधाम यात्रेस जाता येणे शक्य नव्हते. तक्रारदार महीला हिने बुकींग केल्या नंतर १ ते दीड वर्षे झाल्यां नतर कोरोना महामारीमुळे संपुर्ण निर्बंध (Restrictions) असल्याने चारधामा यात्रा जाणे शक्यच नसल्याने तक्रारदार हीने स्वतः व पती संदीप दा. महाजन यांनी केसरी टुर्स ग्रुपकडे वेळो-वेळी पत्रव्यवहार फोनव्दारे, मेलव्दारे व प्रत्यक्ष भेटुन चारधाम यात्रेची बुकींग रक्कम रू.१,९७,४०० / – रक्कम परत करण्या बाबत विनंती केली.

परंतु केसरी टुर्स सदरहु बुंकीग रक्कम (Bunking amount) परत करता येणार नाही असे सांगीतले तक्रारदार यांस आपली बुकींगची रक्कम परत मिळणार हे स्पष्ट झाल्या नंतर त्यांचे पती संदीप महाजन यांनी जळगांव येथील विधी तज्ञ (Legal experts) अँड. अशोक. जे. महाजन (Ashok. J. Mahajan) यांचेशी केलेल्या चर्चाअंती जळगांव येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगात (Consumer Grievance Redressal Commission) दाद मागितली.

आयोगाने सदरहु तक्रारदार सौ. शितल संदीप महाजन यांचा तक्रार अर्ज खर्चासह मंजुर केरून . ग्राहक न्यायालयाने सौ. शितल महाजन यांच्या बाजूने दि.२८ फेब्रू.२०२२ रोजी दिलेल्या निकालात स्पष्ट केले आहे की, केसरी टुर्स व जळगांव येथील कार्यालय यांना तक्रारदार यांनी दाखल तारखेपासुन ते संपुर्ण रक्कम (Return Money) अदा होई पावेतो रक्कम रू. १,९७, ४०० ₹ त्यावर ९% व्याजासह अदा करण्यात यावेत तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थीक त्रासापोटी रक्कम रू. ७००० ₹ व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रू. ३००० ₹ मात्र आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसाचे आत करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.केसरी टुर्सने यात्रेकरीता घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे जळगांव ग्राहक आयोग अध्यक्ष पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी निकाल दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या