Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या“माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात…”; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यामुळे खळबळ

“माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात…”; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यामुळे खळबळ

मुंबई | Mumbai

टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार म्हणाले. सत्तारांच्या या विधानाने शिंदे गटातच अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचं समोर आलं आहे.

सत्तार बोलतांना म्हणाले, ‘कथीत टीईटी घोटाळा प्रकरण मी मंत्री असतानाचं बाहेर का आलंय? तर या प्रकरणात मी पंचवीस पैशाचाही फायदा घेतलेला नाही. यासाठीच्या कागदाची किंमत पगार नाहीतर नोकरीसाठी असते. आम्ही यामध्ये कसलाच घोटाळा केला नाही असा रिपोर्ट आयुक्तांनी दिला, जिल्हा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक यांनीही दिला. यापेक्षा आता काय प्रुफ पाहिजे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. यामागे माझ्या पक्षातील लोक असतील, माझे हितचिंतक असतील किंवा विरोधीपक्षातील ज्यांच्या खुर्च्या खाली झाल्या, जे मलई खात होते ते ही असतील.’

तसेच ‘माझ्याविरोधात जी बातमी आली त्यावर मला शंका आली की मुख्यमंत्र्यांच्या घरात आमची जी चर्चा झाली ती बाहेर मीडियापर्यंत आली. मग मी मुख्यमंत्र्यांना याची तक्रार दिली की आपल्या चर्चेतील गोष्टी बाहेर कशा जातात? पण याबद्दल मी बोलणार नाही. पण तो नेता महाराष्ट्रातील आहे. माझ्यापेक्षाही विरोधकात माझे हितचिंतक अनेक आहेत. त्यामुळेही हे लोक जळत असतील.’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मी राष्ट्रवादी पक्षात आलो नाही याची चीड आहे का? अशी विचारणा केली. मी लोकांसाठी लढत आहे, भांडत आहे, काम करत आहे. काही लोक मात्र फक्त उद्योगपतींसाठी काम करतात असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या