Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात प्लाज्मा डोनर्स योजनेत दोनशे जणांची संमती

नाशकात प्लाज्मा डोनर्स योजनेत दोनशे जणांची संमती

नाशिक । Nashik

भारतीय जैन संघटना(बीजेएस) यांच्याकडुन सुरू करण्यात आलेल्या प्लाझमा डोनर्स जीवनदाता योजनेअंतर्गत 200 च्यावर करोनावर यशस्वी मात केलेल्या व्यक्ती आपल्या रक्तातील प्लाज्मा दान करण्यासाठी संमती पत्रे भरून दिली आहेत. यावरुन आता प्लाझमा दानासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नाशिक शहरातील करोना संसर्ग रोकण्यासाठी महापालिकेसोबत मिझन झिरो मध्ये मोठा सहभाग नोंदविणार्‍या भारतीय जैन संघटना(बीजेएस) यांच्याकडुन आता याच संघटनेकडुन प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजना सुरू करण्यात आली आहे. करोनावर विजय मिळविणार्‍या रुग्णांकडुन रक्तातील प्लाज्मा घेऊन इतर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी आता बीजेएसकडुन काम सुरू झाले असुन करोना मुक्त झालेल्या व्यक्तीकडुन संमती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान या शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यास शहरातील काही नगरसेवक, समाज कार्यकर्ते, राजकिय मंडळी समोर आली असुन प्लाझमा दानासाठी पुढाकार घेत आहे. शहरात मिशन झिरो सुरू झाल्यानंतर ही योजना पुढे आणण्यात आली आहे. यात 70 दिवसात शहरात 200 करोनावर मात केलेल्या व्यक्तींनी प्लाज्मा दानासाठी संमती अर्ज भरुन दिले आहे.

करोनासंदर्भात प्लाज्मा थेरपीचा चांगला फायदा झाल्याचे समोर आल्यानंतर आता केंद्र व राज्य शासनाकडुन याच्या वापरासंदर्भात निर्णय लवकरच होणार आहे. हेच लक्षात घेत शासनाकडुन सकारात्मक निर्णय लवकर होणार आहे. असे असले तरी बीजेएसकडुन प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजनेची शासन निर्णयानंतर तात्काळ अंमलबजावणी करण्याची तयारी करण्यात आली आहे.

अलिकडेच या संघटनेकडुन राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यानंतर नाशिक शहरात मिशन झिरो अंतर्गत 20 मोबाईन डिस्पेन्सरी सुरु करण्यास महापालिकेला मोठा हातभार लावला आहे. करोना मुक्त झालेल्या रुग्णांकडुन प्लाज्मा घेण्यासाठी संमती फार्म भरुन घेण्याचे काम केले जात आहे.

यात महापालिकेच्या काही कर्मचार्‍यांसह नाशिककरांनी आपले फार्म भरुन देत करोनाविरुद्दच्या लढ्याला हातभार लावला आहे. करोना बाधीतांचे शहरात आता मृत्युचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण प्लाज्मा डोनर्सच्या माध्यमातून मृत्यु कमी करता येणार असल्याने या संघटनेनेकडुन आता करोनावर विजय मिळविणार्‍या व्यक्तींना प्लाज्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती बीजेएसचे राज्य प्रभारी व योजना प्रकल्प सचालक नंदकिशोर साखला यांनी दिली.

संघटनेचे नाशिककरांना आवाहन

कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी झालेल्या 18 ते 55 वयोगटातील व इतर मोठे आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझमा इतर करोना बाधित रुग्णांना दिला जातो व गंभीर करोना रुग्ण करोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी होतात. म्हंणुनच प्लाज्मा दान संमती पत्रे भरून देण्यासाठी 8669668807 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या