चामरलेणी परिसरात साडेसातशे करवंदांची लागवड

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वृक्षवल्ली या संस्थेकडून चामरलेणी (Chamarleni) डोंगरावर वृक्ष लागवड (Conkerberry tree plantation) आणि झाडांचे संगोपन केले जात आहे. संस्थेने आतापर्यंत जवळपास दहा एकर जागेत ४हजार ५०० झाडे लावून जगवली आहेत. यासाठी दर वर्षी पावसाळाच्या सुरवातीला लागवड करून पुढील वर्षभर झाडांची देखभाल, गवत काढणी, झाडांना पाणी देणे ही कामे संस्था दर आठवड्याला करते. नाशिक शहरातील तरुण वर्ग, लहान मुले, सायकल ग्रुप्स, वन विभाग यात आनंदाने सहभागी होत असतात…(Conkerberry tree plantation in nashik chamarleni)

चामरलेणी परिसरात मोठ्या प्रमाणात करवंदाची (Conkerberry plantation) लागवड करताना जागेचे आणि लागवड पद्धतीचे विचारपूर्वक नियोजन करण्यात आले असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. जंगलची काळी मैना नावाने ओळखल्या जाणाऱ्या या करवंद फळा सोबत या झाडाचे इतरही फायदे असल्याने ही झाड लावण्यात आली.

वृक्ष लागवड करताना डोंगर उतारावर झिग झॅग पद्धतीने लावलेल्या झाडामुळे संस्थेने लावलेल्या इतर झाडांसाठी एक नैसर्गिक कुंपण तयार होणार आहे. त्यामुळे इतर झाडांना चराईसाठी येणारी गुरे आणि मानवी हस्तक्षेपाचा होणारा त्रास कमी होईल. डोंगरउतारावर असलेली ही झुडूप प्रकारातील झाडे माती धरून ठेवण्यासही मदत करतील.

यावेळी गिव्ह संस्थेचे रमेश अय्यर, वायुसेनेचे विनोद सर, नाशिक सायकलिस्ट संस्थेचे किशोर माने, तसेच पर्यावरण चळवळीतील अंबरीश मोरे, प्रशांत परदेशी, आणि वृक्षवल्ली संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *