Friday, April 26, 2024
Homeनगरकाँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीत युवकांना जबाबदारी देणार

काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीत युवकांना जबाबदारी देणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा काँग्रेसची जिल्हा पातळी, तालुका पातळी व ग्रामीण भागातील गाव पातळीपर्यंत त्रिस्तरीय संघटनात्मक बांधणी करण्याचा एक व्यापक कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे.

- Advertisement -

गावपातळीपर्यंत सक्षम काँग्रेस पक्षाचे संघटन निर्माण करण्यासाठी युवकांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार असून युवक कार्यकर्त्यांनी या संघटनात्मक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित जिल्हा काँग्रेसच्या दक्षिण विभागातील जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्षांच्या संघटनात्मक आढावा बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके उपस्थित होते. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भैय्या वाबळे, कार्याध्यक्ष राहुल उगले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे सर तसेच दक्षिण विभागातील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, बाळासाहेब आढाव, किरण पाटील, संभाजी रोहकले, नासीर शेख, दीपक भोसले, शहाजीराजे भोसले, डॉ. अमोल फडके, मनोहर पोटे, सचिन घुले आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष अध्यक्ष साळुंके म्हणाले, जिल्ह्यात गाव पातळीपर्यंत काँग्रेसचे संघटन निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद गटाचे पातळीवर गट प्रमुख व पंचायत समिती गणाचे गण प्रमुख नेमण्यात येत असून प्रत्येक जिल्हा परिषद गटातील व गणातील प्रत्येक गावात शाखा निर्माण करण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

पुढील तीन महिन्यांत प्रत्येक गटातील व गणातील गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या ग्राम शाखा निर्माण करण्यात येतील. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी केले. याप्रसंगी किरण पाटील, बाळासाहेब आढाव, अमोल फडके, दिपक भोसले, नासीर शेख संपतराव म्हस्के यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या