तरुणांचा काँग्रेसमध्ये सहभाग याचा अर्थ वातावरण बदलले

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

सध्या तरुणांचा काँग्रेसमध्ये(Congress) मोठ्या प्रमाणावर सहभाग याचा अर्थ वातावरण बदलले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट येणार आहे. आगामी काळात शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत (Shirdi Nagar Panchayat elections) कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिली.

शिर्डीत काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर, काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, लताताई डांगे, श्रीकांत मापारी, विक्रांत दंडवते, स्वराज त्रिभुवन, अमृत गायके, सुरेश आरणे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, मदन मोकाटे, समीर शेख आदी पदाधिकार्‍यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शिर्डी विधानसभा मतदार संघात (Shirdi Assembly constituency) काँग्रेस पक्षाची (Congress Party) पुन्हा एकदा नव्या जोमाने मोर्चेबांधणी सुरु झाली. पुष्पक रिसोर्ट येथे आयोजित कार्यक्रमात कॉ्ंग्रेस पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.

शिर्डी नगरपंचायत निवडणूक (Shirdi Nagar Panchayat elections) स्वतंत्रपणे लढवण्याबाबतचा निर्णय देश व राज्यपातळीवर घेतला जाईल. मोदी-पवार भेटीत (PM Modi- NCP Pawar Visite) आश्चर्य वाटलं नसल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डी नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून श्री साईबाबा संस्थानमध्ये लवकरच विश्वस्त मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याचे सांगितले.

राज्यघटनेचा आदर करणारा काँग्रेस पक्ष असून समाजातील दीनदुबळ्यांंसाठी पुन्हा एकदा उभा नव्या जोमाने उभा करणार असल्याचे डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.

लताताई डांगे यांनी ना.थोरात यांचे निळवंडे धरण (Nilwande Dam) आणि कालव्याच्या कामाबाबत अभिनंदन केले. प्रास्ताविक अ‍ॅड अविनाश शेजवळ यांनी केले तर आभार स्वराज त्रिभुवन यांनी मानले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *