Friday, April 26, 2024
Homeनाशिककाँग्रेस सेवादल कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

काँग्रेस सेवादल कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये (bharat jodo yatra) नाशिक शहर काँग्रेस (Nashik City Congress) सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर (President Dr. Vasant Thakur) यांनी दिली.

- Advertisement -

शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) आयोजित बैठकीमध्ये भारताचे प्रथम पंतप्रधान (Prime Minister) स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. खासदार गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून त्याच्या नियोजना संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

सर्व काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवा दलाच्या गणवेशामध्ये या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. सुमारे शंभर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग राहणार आहे. गुरुवारी (दि.१७) नाशिकमधून निघण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. याप्रसंगी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे (Nashik City Congress Seva Dal) शहराध्यक्ष डॉ वसंत ठाकूर, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश मारू,

धोंडीराम घोडके, अशोक लहांगे, उद्धव पवार, मुकेश त्रिवेदी, सिद्धार्थ गांगुर्डे, मुन्ना ठाकूर, अमोल सूर्यवंशी, संतोष हिवाळे, उमेश चव्हाण, अण्णा मोरे, दत्ता कासार, मिलिंद वाबळे, विशाल वैष्णव,राजू जगताप, चक्रवीर सोनवणे, हेमंत परदेशी, विनायक ठाकूर,सचिन जाधव,मंगेश बडे, निलेश गायकवाड, महेंद्र चव्हाण,राजेश गांगुर्डे, विजय परदेशी, रोहन कासार,प्रवीण काटे, अनिल आंबेकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या