Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याहिंमत असेल तर यात्रा आडवून दाखवा - राहुल गांधी

हिंमत असेल तर यात्रा आडवून दाखवा – राहुल गांधी

मुंबई | Mumbai

कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) अकोल्यामध्ये (Akola)आहे. त्यातच यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. सोबतच हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा आडवून दाखवा असे आव्हानही राहुल गांधी यांनी भाजपाला (BJP) केले आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून भारतात भीतीचे वातावरण आणि हिंसा पसरवली जात आहे. भाजपचे नेते शेतकरी (Farmer) आणि तरुणांसोबत बोलत नाहीत. एकीकडे देशातील सर्व संस्था उभ्या आहेत. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र भाजपाचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थावरही भाजपाचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. त्यामुळे काँग्रेस (Congress) विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे. हा वरवरचा समज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केली आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, त्यांना भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे राहुल गांधींनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पैसे मोजलेले आहेत. हे पैसे मुख्यत: खासगी संस्थांना दिलेले आहेत. पालक दिवसभर काम करतात. दुसरीकडे महागाई वाढत आहे. असे असतानाच त्यांच्या पाल्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. पालकांना त्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसेच आम्ही माध्यमांसमोर, संसदेत आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनीदेखील तो प्रयत्न केला. मात्र आमच्याकडे कोणताही अन्य उपाय शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या