Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील करोना बाधित

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील करोना बाधित

मुंबई | Mumbai

देशात करोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाची बाधा सर्वसामान्य नागरिकांपासून ते लोकप्रतिनिधींनाही झाली आहे. आता, काँग्रेसचे महाराष्ट्र (Congress Maharashtra ) प्रभारी एच के पाटील (H K Patil ) यांना करोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

एच के पाटील हे मागील आठवड्यात गुरुवारी एक दिवस मुंबईत होते. पाटील यांनी राज्यातील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतलेली होती. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेकजण या मिटींग उपस्थितीत देखील होते. त्यानंतर एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आलेली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिलेला आहे.त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या