Saturday, April 27, 2024
Homeनगरकाँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने पिचडांना दिले पक्ष प्रवेशाचे आमंत्रण

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने पिचडांना दिले पक्ष प्रवेशाचे आमंत्रण

अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांची आज काँग्रेसच्या तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी राजूर येथील निवासस्थानी भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

- Advertisement -

दरम्यान काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने पिचड यांचयाबरोबर दूरध्वनीवरून संपर्क साधत तब्येतीची विचारपूस करतानाच तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष उत्सुक आहे .साहेब तुमचे व काँग्रेसचे ऋणानुबंध आहेत, असे म्हणत काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले. मात्र पिचड यांनी याबाबत स्पष्ट बोलणे टाळल्याचे समजते. काँग्रेस नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना तालुक्यात उधाण आले आहे.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होताच तालुक्यातील गावागावांतील कार्यकर्त्यांनी राजूर निवासस्थानी भेट देऊन, साहेब आम्ही तुमचेच आमचा पक्ष तुम्हीच म्हणत त्यांची भेट घेतली व त्यांना आधार दिला. अकोले, समशेरपूर, देवठाण, खडकी, कोतूळ, सतेवाडी, पाडाळणे, निब्रळ, मोग्रस, ब्राह्मणवाडा, अंबड, विठा, इंदूरी येथील शेतकरी, युवक कार्यकर्त्यांनी येऊन पिचड यांना पाठिंबा दिला. तर दूरध्वनीवरून अनेकाचे फोन आले. माजी आमदार वैभवराव पिचड हे देवठाण येथील कार्यक्रमासाठी गेले असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून सवांद साधला.

तर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, पं.स. चे माजी सभापती व पक्षाचे अध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, संपतराव कानवडे, बाळासाहेब नाईकवाडी, डॉ. डी. के. सहाणे, शंकरराव वाळुंज यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी माजी मंत्री पिचड यांच्याशी बंद खोलीत एक तास चर्चा केली. तर यावेळी साहेब काँग्रेसमध्ये या आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी विनंती या शिष्टमंडळाने केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या