Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात महाराष्ट्रातील भाजपने 'ट्रॅप' रचला; काँग्रेस नेत्याचा आरोप

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात महाराष्ट्रातील भाजपने ‘ट्रॅप’ रचला; काँग्रेस नेत्याचा आरोप

मुंबई । Mumbai

अयोध्या दौरा (Ayodhya tour) जाहीर झाल्यावर त्याला विरोध सुरू झाला. त्याची माहिती दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेशातून मिळाली. हा सगळा सापळा असल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच माझ्या अयोध्या दौऱ्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा गंभीर आरोप मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी (२२ मे) आपल्या पुण्यातील (pune) सभेत केला आहे. त्याच्या या आरोपांवर आता महाराष्ट्र काँग्रेसचे (congress) सरचिटणीस सचिन सावंत (sachin sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या या आरोपांवर काँग्रेसचे (congress) सरचिटणीस सचिन सावंत (sachin sawant) म्हणाले की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजच्या भाषणात ‘अयोध्या द ट्रॅप’ (Ayodhya the Trap) या चित्रपटाची गंभीर कहाणी सांगितली आहे. या कहाणीचा रचेता भाजपा (bjp) आहे हे महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेला समजले आहे.

जर अयोध्येला (Ayodhya) गेलो असतो, तर कार्यकत्यांना जेलमध्ये सडवले असते. उत्तर प्रदेशमध्ये महाविकास आघाडी सरकार नसून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे भाजपाचे सरकार आहे.

तिथे भाजपाचाच (BJP) खासदार विरोध करत आहे. तेव्हा तिथे रसद पुरवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल, तर तो महाराष्ट्रातील भाजपाचाच असू शकतो हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचेही मत आहे, असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

तसेच सचिन सावंतांनी पुढे म्हटले आहे की, जे आम्ही काही दिवसांपूर्वी सांगितले आहे ते सत्य आहे हे राज ठाकरे यांनी मान्य केले आहे. मनसेची (mns) कुचंबणा करण्याचे काम भाजपाने केले आहे. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली आहे. भाजपा (bjp) कोणते कुटील कारस्थान रचू शकतो हे या ‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या कहाणीमधून निश्चितच समोर आलेअसेल, असेही सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या