Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस नेत्याची शरद पवारांवर टीका, फडणवीस संतापले; म्हणाले...

काँग्रेस नेत्याची शरद पवारांवर टीका, फडणवीस संतापले; म्हणाले…

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अदानी उद्योग समूहाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला (Modi Government) लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे…

- Advertisement -

अन् चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण

अशातच आता काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदानी यांचा फोटो ट्विट करत टीका केली. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत शरद पवार यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘अब रूल पुष्पा का’; ‘पुष्पा २’च्या टीझरसह अल्लू अर्जुनच्या लूकची होतेय चर्चा

शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन काँग्रेस नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो ट्विट केला आहे. “भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या हितासाठी हुकूमशाही सत्ताधीशांचे गुणगान गात आहेत. पण, राहुल गांधी एकटे देशातील जनतेसाठी लढाई लढत आहेत. तसेच, भांडवलदार चोर आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही,” असे अलका लांबा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी हिंदुत्वाचा अजेंडा; शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर पवारांची टीका

दरम्यान, या ट्विटवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. “राजकारण होत आणि जाते. पण, काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांचा ३५ वर्षातील मित्रपक्ष आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री असणाऱ्यांबद्दल केलेले ट्विट आश्चर्यकारक आहे. भारतातील राजकीय संस्कृतीत राहुल गांधी घाणेरडे राजकारण करत आहेत,” असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या