खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केली ही मागणी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

खारघर दुर्घटनेप्रकरणी (Kharghar accident case) महाराष्ट्र भूषण पुरस्कार आयोजकांवर (Maharashtra Bhushan Award Organizers) म्हणजेच राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Crime of culpable homicide) दाखल करण्यात यावा आणि निवृत्त न्यायाधीशांमार्फत (retired judge) चौकशी (inquiry) व्हावी. तसेच दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, अशी मागणी (Demand) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (Congress district president)यांनी सोमवारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी काँग्रस प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, शहराध्यक्ष शामकांत तायडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार पुढे म्हणाले की, खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम एखाद्या सभागृहात घेता आला असता अथवा मोकळ्या जागेत मंडप टाकून घेतला पाहिजे होता. मात्र, याठिकाणी ना पाण्याची, ना खाण्याची सोय होती. या कार्यक्रमाचे कुठलेच नियोजन नव्हते. मात्र, राजकीय भांडवल गोळा करण्याच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम घेऊन केवळ दिल्लीतील नेत्यांना खुश करण्यासाठी भर दुपारी उन्हात ठेवला गेला. या घटनेत शासनच दोषी आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

देशाचे गृहमंत्री अमित शहा या पुरस्कार सोहळ्यात भाषण करीत असताना अनेक लोक चक्कर येऊन पडत होती. तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेतून नेले जात होते. तरीही अमित शहा यांचे भाषण सुरूच होते. हे भारतीय लोकशाहीला न शोभणारे आहे, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केली. खारघर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. मात्र, ती दडविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असूनही अशी घटना घडते. या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. राज्य सरकार संवेदनाहीन झाले असून या राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि निवृत्त न्यायाधीशामार्फत निरपेक्ष चौकशी व्हावी, पोलीस खात्याच्यावतीने 304 अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा,अशी मागणी प्रदीप पवार यांनी केली. यावेळी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, दिल्लीश्वराला खुश करण्यासाठी हा सर्व खटाटोप झालेला आहे. खारघर दुर्घटनेप्रकरणी राज्यशासनावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष शामकांत तायडे यांनीदेखील या प्रकरणाची चौकशीची मागणी केली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *