Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंद्यात करोनाच्या चाचणीत सावळा गोंधळ

श्रीगोंद्यात करोनाच्या चाचणीत सावळा गोंधळ

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) –

तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासन देखील उपाययोजना राबवत

- Advertisement -

असले तरी आरोग्य यंत्रणेतील सावळा गोंधळ उघड होत असून तब्बल 10 दिवस होऊन गेल्यानंतर देखील अनेकांचे करोना अहवाल आलेले नसताना एका व्यकीची तर करोना तपासणी चाचणी करण्यापूर्वीच अहवाल देण्यात आला. असे अनेक प्रकार घडत असल्याने वैद्यकीय अधिकारी देखील करोना तपासणी करणार्‍यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यातच मग्न आहेत.

तालुक्यातील करोना बाधितांची संख्या वाढत आहे. करोनाची चाचणी करण्यासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात नमुने घेऊन नगरला पाठवले जातात. साधारणपणे दोन ते तीन दिवसांत तपासणी अहवाल येणे अपेक्षित असताना काही तपासणी अहवाल 10 ते 15 दिवस होत आले तरी प्राप्त झाले नाहीत. आपण नेमके करोना पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह आहोत याची माहिती ज्यांनी तपासणी केली त्यांनाही मिळत नाही. आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे कारण देण्यात येत असले तरी अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक महिला 10 दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णालयात करोना तपासणी केली. अहवाल आला नसल्याने रुग्णालयातून घरी जात येत नाही. तर 17 व 19 मार्च रोजीचे अनेकांचे तपासणी अहवाल अजून मिळालेच नाहीत.

कृषी विभागातील सहायक कृषी अधिकारी यांना लक्षणे दिसत असल्याने ते करोना चाचणी करण्यासाठी गेले.केस पेपर घेतला तर चाचणी होण्यापुर्वीच त्यांचा निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यांनी लगेच ही चूक संबंधितांच्या लक्षात आणून दिली . नंतर मात्र रुग्णालयात नेत तेथे त्यांची चाचणी केली तर ती पॉझिटिव्ह आली . विशेष म्हणजे एकाच केस पेपर वर निगेटिव्ह व पॉझिटिव्ह असे दोन्ही शिक्के आरोग्य विभागाने दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या