Saturday, April 27, 2024
Homeनाशिकयशस्वी उद्योजकसाठी आत्मविश्वास महत्वाचा : राठी

यशस्वी उद्योजकसाठी आत्मविश्वास महत्वाचा : राठी

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

कोणताही उद्योग (Industry), व्यवसाय सुरु करताना बाजारपेठेचा, ग्राहकांच्या मागणीचा अभ्यास केला पाहिजे. व्यवसाय-उद्योगात (Business-industry) विविध संकटे येतात, कधी कधी अपयश सुद्धा येते.

- Advertisement -

अशावेळी टिकून राहणे महत्वाचे असते. यशस्वी उद्योजक (Successful Entrepreneur) होण्यासाठी सातत्य, नावीन्यपूर्णता, निष्ठा, आत्मविश्वास (Confidence) आणि प्रामाणिकपणा (Honesty) आवश्यक असतो असे मत रामबंधू मसालेवाले प्रा.लि. (Rambandhu Masale) चे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक हेमंत राठी (Entrepreneur Hemant Rathi) यांनी व्यक्त केले आहे.

मविप्र (MVP) च्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी राठी बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.आशा कदम, प्रा.भगवान कडलग, प्रा.निशांत वडघुले उपस्थित होते. राठी पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे.

स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि निष्ठेने, काटकसरीने तो चालविला पाहिजे. भांडवली खर्च जास्त करण्याऐवजी ज्या वस्तूचा व्यापार करणार आहात त्या वस्तूवर (वर्किंग प्रोडक्ट) वर लक्ष केंद्रित करावे. पाहिजे ते कष्ट घेण्याची तयारी ठेवावी असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी रामबंधू उद्योगाचा प्रवास विद्यार्थ्यांना (students) उलगडून सांगितला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता औद्योगिक क्षेत्रात करिअर करावे व स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.आशा कदम यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रा.सोपान वाटपाडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.सविता कदम यांनी करून दिला. प्रा.विनय कदम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. संतोष दळवी, प्रा. निशांत वडघुले, प्रा. किरण तिडके, प्रा.श्रीमती. मंजुषा भंडारे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, प्राध्यापकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या