Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमाती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन

माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन

उगाव। प्रतिनिधी ( Ugaon)

मविप्र समाज संस्था ( Maratha Vidyaprasarak Sanstha )संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयात (Karmayogi Dulaji Sitaram Patil Agricultural College) ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शिवडी येथे मृदा व कृषी रसायनशास्त्र या विषयाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

- Advertisement -

यात शेतकर्‍यांना मृदा परीक्षण व चाचणी मातीतील पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त घटक या संबंधी माहिती देण्यात आली. तसेच मातीचे नमुने कसे घ्यावेत याचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना करून दाखविण्यात आले. तसेच शेतकर्‍यांच्या माती संबंधित असलेल्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात येवून शेतकर्‍यांना मृदा परीक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले.

मातीचे नमुने हे महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या शिबिराला शेतकर्‍यांचा प्रतिसाद लाभला. शिबिराचे आयोजन प्राचार्य आय.बी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी एस.पी. देशमुख, मृदा व कृषी रसायनशास्त्र विषय तज्ज्ञ एन.आर. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत प्रथमेश केदार, तेजस केदार, प्रशांत खेडकर, भावेश खोमणे, दर्शन लहारे, अनिकेत यादव यांनी प्रात्यक्षिक सादर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या