भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सवलती मिळाव्यात

jalgaon-digital
2 Min Read

शिरपूर Shirpur। प्रतिनिधी

राज्याच्या कानाकोपर्‍यात सर्वत्र भटक्या विमुक्त समाज Nomadic society हा मागासलेला आहे. अद्यापही हा समाज शासकीय योजनांपासून Government schemes वंचित आहे. लोकप्रतिनिधी व शासकिय अधिकारी यांनी या योजनेचा लाभ वस्ती, पाडेमधील भटक्या जातीच्या लोकांना मिळवून देण्यासाठी विशेष योजना आखावी, असे आवाहन भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. नरेंद्र पवार State President of BJP Bhatakya Vimukta Aghadi Narendra Pawar यांनी केले.

शहरातील आर. सी. पटेल फार्मसी कॅम्पसमधील एस. एम. पटेल हॉल येथे भाजपा भटके विमुक्त आघाडीतर्फे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचा अध्यक्षस्थानी आ. काशिराम पावरा हे होते. माजी. आ. नरेंद्र पवार पुढे म्हणाले की, भटक्या समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी एस. सी., एस. टी. प्रमाणे सवलती मिळाव्यात.

मात्र आम्हाला सवलत देतांना कोणत्याच समाजाचे नुकसान न होता मिळाव्यात असे आवाहन त्यांनी शासनाला केले. यावेळी आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सहसंयोजक अशोक चोरमले, महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. सौ. उज्जवलाताई हाके, युवती प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. सौ. भाग्यश्री ढाकणे, उत्तर महाराट्र संयोजक नवनाथ ढगे, जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर माजी आ. नरेंद्र पवार, आ. काशिराम पावरा, जि.प. अध्यक्ष तुषार रंधे, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक संपत नागरे, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, बोराडी उपसरपंच राहुल रंधे, जि. प. सदस्य योगेश बादल, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, धुळे जिल्हाध्यक्ष पिंटु बंजारा, तालुकाध्यक्ष अरविंद जाधव, नगरसेवक गणेश सावळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील, उत्तर महाराष्ट्र युवक संयोजक बदुलाल राठोड, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यालय प्रमुख राज खैरनार, संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, सुनिल चौधरी, बापु लोहार, राधेश्याम भोई, पं. स. सदस्य दर्यावसिंग जाधव, पं. स. माजी सदस्य अजमल जाधव, बन्सीलाल जाधव आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक किशोर गोपाळ यांनी केले. मेळावा यशस्वितेसाठी चंद्रकांत जाधव, विशाल धनगर, लक्ष्मण गोपाळ, शिवानंद चव्हाण, रोहिदास गोपाळ, ओंकार पवार, विजय गोपाळ, जितेंद्र जाधव, भरत राठोड, हर्षल बुवा, किसन जाधव, श्रावण चव्हाण, प्रेमराज राठोड, संतोष जाधव, लोटन धनगर, अशोक चव्हाण, अनारसिंग जाधव, बच्छु राठोड, दरबार जाधव आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन विजय बागुल यांनी केले. तर आभार अरविंद जाधव यांनी मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *