प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा…; संगणक चालकांचा इशारा

वाजगाव | वार्ताहर | Vajgaon

ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक चालकांच्या प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास 1 मार्च 2023 पासून देवळा तालुक्यासह राज्यातील संगणक कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती देवळा यांचेकडे कऱण्यात आली आहे…

निवेदनाचा आशय असा की, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील 11 वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रमाणिक काम करत आहेत. ग्रामीण भागातील 7 कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देत असून महागाईच्या काळात त्यांना फक्त 7 हजार अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे, आणि तेपण वेळेवर दिले जात नाही. 

संगणकचालकांना ग्रामपंचायत सुधारित आकृतिबंधात ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे. याबाबत तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी लेखी आश्वासन देत मान्य केले होते. परंतु निर्णय घेणे बाकी होते. 

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट? पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेल्या धोकादायक व्यक्तीचा शहरात वावर, NIA चा अलर्ट

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दि .27 व 28 डिसेंबर 2022 रोजी रात्रंदिवस आंदोनल केले. या आंदोलनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी लेखी आश्वासन दिले.

ते आश्वासन पूर्ण करावे व राज्यातील संगणक चालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन लागू करावे आदी प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 1 मार्च पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशकात रयत क्रांती संघटना आक्रमक; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ‘कांदा भाकरी’ आंदोलन

निवेदनावर राज्याध्यक्ष सिध्येश्वर मुंडे, राज्य उपाध्यक्ष मुकेश नामेवार, राज्य सचिव मयूर कांबळे, जिल्हाध्यक्ष आत्माराम घोटेकर, देवळा तालुकाध्यक्ष विजय जाधव, देवाजी सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी उपाध्यक्ष, भिमराव आहिरे सचिव, समीर बच्छाव  खजिनदार, रुपेश जाधव संघटक, सचिन पवार मार्गदर्शक, भूषण खैरनार, गणेश पगार, केदु पगार, तुषार चंदन, वैभव बच्छाव, अन्सार तांबोळी, अमोल पगार, मंगेश सुर्यवंशी, दादासाहेब बच्छाव, सोमेश शेवाळे, मुकेश आहिरे, समाधान मोरे, सुनील शिंदे, किशोर आहिरे, स्वप्नील भदाणे, राहुल बागुल, नितीन शिंदे, तेजस्वी सोनवणे, नंदिनी सांबरे, माधुरी शिरसाठ आदी कर्मचारी उपस्थित होते.