Friday, April 26, 2024
Homeनाशिकवलखेड ननाशी रस्त्याच्या कामाबद्दल तक्रारी

वलखेड ननाशी रस्त्याच्या कामाबद्दल तक्रारी

वलखेड | वार्ताहर | Valkhed-Dindori

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) वलखेड (valkhed) ते ननाशी (nanashi) रस्त्याचे कामाबद्दल (road work) नागरिकांच्या तक्रारींचे पीडब्ल्यूडी (PWD) अधिकारी अहिरे यांच्याकडून दखल घेऊन ठेकेदारांना समज दिली

- Advertisement -

येथील रस्त्याचे काम चालू झाले असून काम निकृष्ट दर्जाचे वाटल्याने जागृत नागरिकांनी कामाबद्दल नाराजी व्यक्त केली व कामे चांगली करण्याबाबत पी डब्ल्यू डी अधिकारी अहिरे व कॉन्ट्रॅक्टर यांना बोलावून कामाबद्दल ठिकठिकानी खोलून दाखवून कामाचा दर्जा सुधरावण्या बद्दल सांगितले कारण कामे तर झाली पाहिजे असे सांगून कामे चांगली करण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी अधिकारी अहिरे यांनी ठेकेदारांना सूचना दिल्या.

कामांचे इस्टीमेंट (Estimate) आहे त्याप्रमाणे कामे करणे व खराब कामे झाली तर कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असेही सांगितले व शेतकरी (farmers) व नागरिकांना कसेकसे कामे आहेत याबद्दल माहिती दिली शेतकरी वर्ग व नागरिक रस्त्यावरील धुळीमुळे बेजार झाले आहेत व खराब रस्त्यामुळे नागरिकांना दवाखान्यात जावे लागते तसेच गाड्यांचीअवस्थाही खराबी झाली आहे त्यामुळे आम्ही सर्व नागरिक तुम्हाला सहकार्य करू तुम्हीपण रस्ते चांगले करा असे नागरिकांतर्फे सांगण्यात आले.

याप्रसंगी सरपंच विनायक शिंदे संतोष वाघ, शंकर नाठे, मंगला शिंदे, गंगाधर निखाडे, अनंत पाटील, नारायण राजगुरु, केशव मेधने, चिंटू पाटील, हिरामण पाटील, शिवाजी पिंगळे, प्रकाश महाले, मच्छिंद्र पवार, राकेश वाघ, रामनाथ पाटील,बापू पाटील आदी बहुसंख्येने नागरिक हजर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या