Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकअखेर रूग्णालय आंदोलन प्रकरणी भावें वर गुन्हा

अखेर रूग्णालय आंदोलन प्रकरणी भावें वर गुन्हा

नाशिक। प्रतिनिधी

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये फेसबुक लाईव्हद्वारे अर्धनग्न आंदोलन करणारे ’आप’चे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे तसेच रुग्णाचे नातेवाईक अमोल भाऊशेठ जाधव यांच्याविरुद्ध अखेर मुंबई नाका पोलिस ठाण्यात जमाव जमवणे, धमक्या देणे तसेच वैद्यकीय संस्था हिंसा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

- Advertisement -

कोरोना उपचारांनंतर विमा रक्कमेतून बिल भरल्यानंतर डिपॉझिटची रक्कम परत मिळावी यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये 25 मे रोजी दुपारी 3.30 वाजता ’आप’चे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे तसेच रुग्णाचे नातेवाईक अमोल भाऊशेठ जाधव यांनी फेसबुक लाईव्ह अर्धनग्न होत आंदोलन केले होते.

या आंदोलनाबाबत शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटली होती. यामुळे हॉस्पिटलमध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर भावेसह जाधव यांना चौकशीसाठी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आणल्यानंतर जमावबंदीचा आदेश मोडून समर्थकांनी आंदोलन केले होते.

या आंदोलन प्रकरणीही तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला होता. हॉस्पिटलबाबत तक्रार असल्यास लेखी देण्याचे आवाहन पोलिसांनी रुग्णांच्या नातेवाईकांना केले होते. परंतू कोणीही पुढे न आल्याने या आंदोलनाबाबत उलटसुलट चर्चा झाली होती.

हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने नमन गंगाप्रसाद यादव (रा. माघ सेक्टर, भुजबळ फार्म रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी (दि.3) पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भावे व जाधव यांनी संगनमताने हॉस्पिटलमध्ये आरडाओरड करत स्वतःच्या अंगावरील कपडे महिला स्टाफच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टरांना धमकावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

या तक्रारीन्वये भावेसह जाधवविरुद्ध शांततेचा भंग करणे, धमकी देणे, जमाव जमवणे याचे भादंवि कायदा कलम 504, 506, 509, 34 सह वैद्यकीय संस्था हिंसा प्रतिबंध अधिनियम 2010 कलम 4 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहायक निरीक्षक गेंगजे अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या