Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागुगलला दणका; जाहिरातीसंदर्भातील धोरणामुळे ‘सीसीआय’ने दिले चौकशीचे आदेश

गुगलला दणका; जाहिरातीसंदर्भातील धोरणामुळे ‘सीसीआय’ने दिले चौकशीचे आदेश

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुगलने (Google) जाहिरात क्षेत्रातील मक्तेदारीमुळे भारतात (India) अवैधरित्या फायदा मिळवला आहे. याविरोधात भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (Competition Commission of India) चौकशीचे आदेश दिले आहेत…

- Advertisement -

डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन (DNPA) च्या तक्रारीनंतर गुगलने प्रतिस्पर्धा कायद्याच्या काही तरतूदींचे उल्लंघन केल्याचे दिसत असल्याचे सीसीआयने (CCI) मान्य केले आहे.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

ऑनलाईन जाहिराती (Online advertising) आणि ॲप डेव्हलपर्सकडून (App developers) प्लेस्टोअरच्या (Playstore) नावावर मनमानी कमिशन (Commission) वसुलण्याच्या आरोपांवरून गुगल आता चौकशीच्या भोवऱ्यात अडकले आहे. गुगल एकाधिकारशाहीचा दुरुपयोग करत असून प्रकाशकांवर अन्यायकारक अटी लादत असल्याचे मत सीसीआयने (CCI) व्यक्त केले आहे.

आयोगाने गुगल आणि मूळ कंपनी अल्फाबेटच्या विरोधात ६० दिवसांच्या आत चौकशी अहवाल (Inquiry report) मागविला आहे. याबाबत डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने (Digital News Publishers Association) म्हटले की, कोणती वेबसाईट सर्वात आधी दिसावी हे गुगल अल्गोरिदमद्वारे निश्चित करते.

रेशन कार्डवर ‘असा’ करा मोबाईल नंबर अपडेट

भारतीय प्रकाशक कंटेंट लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी मोठी गुंतवणूक करतात. मात्र, हा कंटेंट दाखविण्याच्या बदल्यात मिळत असलेल्या जाहिरातीच्या रकमेचा मोठा हिस्सा गुगल आपल्याकडेच ठेवते. गुगल कंटेंट तयार करत नाही केवळ दाखवण्याचे काम करते. गुगल पब्लिशर्सची माहिती लोकांना दाखवून बेकायदेशिररित्या लाभ कमावत आहे.

Photo Gallery : आता नाशिकमध्ये घेता येईल केदारनाथचे दर्शन

दरम्यान, लोकशाहीत न्यूज मीडियाची महत्वाची भूमिका आहे. बड्या टेक कंपन्यांनी त्यांच्या मक्तेदारीचा गैरवापर करू नये. या प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांना मिळणारा महसूल (Revenue) योग्य रितीने दिला गेला पाहिजे. अशी टिप्पणी आयोगाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या