Wednesday, April 24, 2024
Homeजळगावअतीवृष्टी नुकसानीची शेतकर्‍यांना भरपाई

अतीवृष्टी नुकसानीची शेतकर्‍यांना भरपाई

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतीवृष्टी पुरामुळे शेतमालाची मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. कृषीमदत निधी पंचनाम्यानुसार देण्यात आला आहे.

- Advertisement -

या नुकसानीचे पंचनाम्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर मदतीचे वाटप करण्यात येवून आतापर्यंत 89.07 टक्के शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

राज्य शासनाकडून यावर्षी अतीवृष्टी, पुरामुळे खरीप हंगामात शेतीपिकांचें मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते.

या नुकसानीचे पंचनामे स्थानिक पातळीवर महसूल,कृषी विभागाकडून करण्यात येवून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता.

त्यानुसार राज्य शासनस्तरावरून दि. 11 नोव्हेंबर रोजी जिल्हयासाठी 19 कोटी 55 लाख रूपये मदतीपोटी देण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे वितरण तालुकानिहाय करण्यात आले होते.

दिवाळीपूर्वी संबधीत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर हा मदत निधी वर्ग होणे अपेक्षीत होते.

परंंतु दिवाळीच्या सुटयांमुळे विलंबाने का होईना राज्य शासनाकउून आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत आतापर्यत सुमारे 89.07 टक्के मदत निधीच्या रकमेचा लाभ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर करण्यात आला आहे.

89.07 टक्के वितरण

या नैसर्गीाक आपत्तीत सर्वात जास्त नुकसान जळगाव ग्रामीण, एरंडोल, धरणगांव, यावल, रावेर, चोपडा, अमळनेर तालुक्यांत मदतनिधीचे वाटप झाले आहे.

तर सर्वात कमी नुकसान चाळीसगांव पावणेसहा लाख तर भडगांव साडे एकवीस लाख रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या