Saturday, April 27, 2024
Homeनगरअनुकंपा तत्त्वावर 25 पोलीस शिपाई भरती

अनुकंपा तत्त्वावर 25 पोलीस शिपाई भरती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलात अनुकंपा तत्त्वावर 25 जणांची पोलीस शिपाई पदावर भरती करण्यात आली.

- Advertisement -

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या उपस्थितीत त्यांना बुधवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. पोलीस मुख्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे आदी उपस्थित होते.

अनुकंपा तत्त्वावर 20 टक्के जागा भरण्याचा शासनाचा आदेश आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस मुख्यालय येथे मंगळवारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्याकरिता एकुण 33 उमेदवारांना बोलावण्यात आले होते.

पडताळणी दरम्यान 29 उमेदवार पात्र ठरले आहेत. 29 पैकी 25 उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणीअंती 25 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 4 उमेदवारांना प्रशासकीय बाबी पुर्ण झाल्यानंतर त्यांना शासन निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

करोनामुळे मृत पावलेल्या 7 पोलीस कर्मचार्‍यांपैकी दोघांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यात आली असून दोघे अपात्र ठरले आहे. 2 कर्मचार्‍यांचे पाल्य लहान असल्याने नियुक्ती देण्यात आली नाही. तसेच 1 पोलीस कर्मचार्‍याच्या कागदपत्रे कार्यालयाकडे सादर झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या