Thursday, April 25, 2024
Homeजळगावदैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य महत्वाचे

दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य महत्वाचे

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विद्यार्थी Student जीवनात ज्ञानार्जन करतांना संवाद कौशल्य Communication skills अधिकाधिक विकसीत Developed होण्यास मदत होत असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात संवाद कौशल्य अधिक महत्वाचे असते, असे प्रतिपादन मनोज गोविंदवार Manoj Govindwar यांनी केले.

- Advertisement -

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये Vivekananda Pratishthan English Medium School इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढ व विकास या विभागांतर्गत विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संवाद कौशल्य या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते, साहित्यिक त्याचबरोबर समाज शिक्षकफ आणि ङ्गसमाज भूषणफ पुरस्काराचे मानकरी मनोज गोविंदवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी मनोज गोविंदवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पीपीटी आणि अनेक उदाहरणाच्या माध्यमातून संवाद कौशल्य कसे अवगत करावे? याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यात काही उत्कृष्ट संवाद कौशल्याचा मूलमंत्र त्यांनी दिला, यशस्वी व्हायचे असेल तर समोरच्याला मनापासून ऐका, आत्मविश्वास ठेवा, चेहर्‍यावरती स्मितहास्य ठेवा, समोरच्याच्या डोळ्यात डोळे मिळवून बोला, देहबोलीचा उत्कृष्ट वापर करा, अशा पद्धतीने उत्कृष्ट संवाद आपण करू शकली असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या प्रशिक्षणाच्या वेळी माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे तसेच इतर शिक्षकही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा धायबर यांनी केले तर आभार संतोष चौधरी यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या