Friday, April 26, 2024
Homeक्रीडाCWG 2022 : आज भारत-पाकिस्तान भिडणार!

CWG 2022 : आज भारत-पाकिस्तान भिडणार!

दिल्ली | Delhi

रविवार (३१ जुलै) भारताच्या क्रिकेट संघांसाठी आणि चाहत्यांसाठी महत्वाचा दिवस आहे. बर्मिंघम, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला.

- Advertisement -

भारतीय महिला क्रिकेट संघ आज (दि. ३१) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडणार आहे. एजबेस्टन येथील मैदानावर हा रोमहर्षक सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत पहिला विजय नोंदवायचा आहे. खरेतर दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. (IND vs PAK)

पहिल्याच सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव झाला. त्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतने अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. भारताने २० षटकात १५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर रेणुका सिंगने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले तिने पहिले चार फलंदाजांज माघारी धाडले. पण अखेरच्या षटकात भारताला ऑस्ट्रेलियावर दडपण आणता आले नाही आणि ऑस्ट्रेलियाने ६ चेंडू राखून सामना जिंकला

भारत आणि पाकिस्तान सध्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या दोघांचा रन रेटही मायनसमध्ये आहे. मात्र, भारताची स्थिती पाकिस्तानपेक्षा थोडी चांगली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान CWG 2022 सामना Sony Sports Network वर उपलब्ध असेल आणि तुम्ही SonyLIV अॅपवर गेम लाइव्ह स्ट्रीम करू शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या