शेतीपूरक जोडधंदा : तितर पालनातून लाखोंची कमाई

jalgaon-digital
2 Min Read

देवळा | योगिता पवार

सततचा बेमोसमी पाऊस, गारा, दुष्काळ यामुळे शेतकरी सध्या विविध शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. खामखेडा येथील युवा शेतकरी सुरेश कारभारी शेवाळे यांनी असाच एक अनोखा प्रयोग केला आहे. तितर पालन (बटेर जपानी क्विल पक्षी) या व्यवसायाकडे ते वळले आहेत…

धुळे जिल्ह्यातून त्यांनी एका तितर फार्ममधून सुरवातीला ३०० पक्षी आणले. जास्तीचा खर्च न करत त्यांनी आपल्या कांदा चाळीत हे पक्षी ठेवलेत. आता हे पक्षी अंडी देत असून अंडी 3 रुपयाला विकले जाते. तसेच अंडी उबवणी करून १८ दिवसात पिले तयार करत सध्या पाचशेहून अधिक पक्षी ते सांभाळत आहेत.

५२ दिवसाचा मादी पक्षी अंडी देतो. वर्षातून २८० दिवस हा पक्षी अंडी देतो. ह्या पक्षाचे अंडे गुणकारी असल्याने त्याला जास्त मागणी आहे. सध्या त्यांनी आपल्या शेतात कुठलाही अधिकचा खर्च न करता हे पक्षी कांदाचाळीत ठेवले आहेत.

पोल्ट्रीफीड व पाणी दिवसातून दोन वेळा याच गोष्टी लागतात. साठ दिवसाचा पक्षी विक्रीसाठी तयार होत असतो. साधारणता अडीचशे ते तीनशे ग्रम वजनाचा पक्षी तयार होत असून तीनशे रुपये जोडीला बाजारभाव मिळत आहे. घरीच अंडीउबवणी मशीन आणले असून घरीच पिल्ल तयार करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पक्षाचे मांस चरबीविरहीत आहे. मांसामध्ये HDL (High density lipoprotein) कोलेस्ट्रॉल भरपुर प्रमाणात असते. त्याच बरोबर मासात आयरन, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शीयमचे याशिवाय प्रोटीन्स, विटामीन A, B1, B2 आणि मिनरल्स विटामीनचे प्रमाण जास्त असते. तसेच नायसीन जे रक्त आणि कोलेस्ट्रॉल प्रमाणात राखण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते. या पक्षाच्या मांसात ९१ टक्के फॉस्फरस असते. फुफ्फुसातून ऑक्सिजन वाहतुक व्यवस्थित होते. कर्करोगापासून बचाव होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. यामुळे या पक्षाच्या खरेदीसाठी सध्या गर्दी होत आहे. वजन वाढविण्याकरीता कोणत्याही प्रकारची लस, टॉनिक, इंजेक्शन किंवा रसायने दिली जात नसल्याने तितर पक्षाचे मास १००% ऑरगॅनिक असते. स्वादीष्ट व आरोग्यदायी गुणधर्मांनी भरपूर असलेले तितर मटणचा पर्याय म्हणून पुढे येत आहे.

या तितर (बटेर)पक्षाचे मास हे अतिशय गुणकारी असून त्याला खूपच मागणी आहे. सध्या नाशिक मालेगाव व ग्रामीण भागातून हा पक्षी घेण्यासाठी लोक येत आहेत.

सुरेश शेवाळे, शेतकरी खामखेडा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *