Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशCUET 2022 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’!

CUET 2022 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’!

दिल्ली | Delhi

देशभरातील १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १२ वीत ९० % पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या शर्यती पासून आता दिलासा मिळणार आहे. विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी १२ वीत जास्त टक्के मिळविण्याचा ताण विद्यार्थ्यांवर असायचा.

- Advertisement -

मात्र आता नवीन विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CUET) जाहीर केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

VISUAL STORY : सोनम कपूरने फोटो शेअर करत दिली ‘गूड न्यूज’

ही सामायिक प्रवेश परीक्षा आता मराठी, गुजराती, हिंदी सह १३ प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार असल्याचा निर्णय UGC ने घेतला आहे. २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. सर्व UGC अनुदानित केंद्रीय विद्यापीठांमध्ये हा निर्णय लागू केला जाणार आहे.

Amruta Khanvilkar : ‘अप्सरा हो तुम, या कोई परी’! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

- Advertisment -

ताज्या बातम्या