Thursday, April 25, 2024
Homeनगरदोघा कमिशन एजंटांची सहायक फौजदारास मारहाण

दोघा कमिशन एजंटांची सहायक फौजदारास मारहाण

सोनई |वार्ताहर| Sonai

शनिशिंगणापूर (Shanishinganapur) येथील शनिमंदीर बंद (Shani Temple Close) असतानाही रस्त्यावर भाविकांची (Devotees) वाहने अडवून पुजासाहित्याची सक्ती करत असलेल्या कमिशन एजंटांना (Commission Agent) (लटकू) मज्जाव केल्याच्या रागातून सहायक फौजदारास मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणावर गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

- Advertisement -

सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल (Assistant Inspector of Police Sachin Bagul) यांच्या सुचनेनंतर पोलीस पथक (Police squad) भाविकांना त्रास होवू नये याकरीता जिल्हा परिषद शाळा (Zilla Parishad School0 ते शिवांजली चौक हद्दीत (Shivanjali Chowk boundary) गस्त घालत होते. गोपी लॉज व वाहनतळासमोर दोन कमिशन एजंटांनी (Commission agents) सहायक फौजदार बाळू मंडलिक (Assistant Faujdar Balu Mandlik) यांची गचांडी धरुन मारहाण केली. इतर पोलीस येण्याच्या अगोदर आरोपी (Accused) पळून गेले. इतर वाहनतळ परीसरातील लटकूसुध्दा लगेच गायब झाले.

सहायक फौजदार मंडलिक यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 112/2021 भारतीय दंड विधान कलम 353,332, 341, 506(34) नुसार अशोक उत्तम फुलमाळी रा.शास्रीनगर चांदा, किरण बाळासाहेब गव्हाणे रा.शनिशिंगणापूर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल (Assistant Inspector of Police Sachin Bagul) व पथकाने रस्त्यावर अधिक बंदोबस्त वाढविला. सर्व वाहनतळ मालक व व्यावसायिकांना लटकू पुर्णपणे बंद करण्याची सुचना देण्यात आली असून यापुढे अडवणूक, सक्ती, पुजासाहित्याचे अधिक पैसे घेणे, भाविकांना दमदाटी करणे आदी प्रकार झालाच तर कठोर कारवाई करण्यात येईल.देवस्थानचे नाव खराब होवू नये याकरीता गर्दीच्या दिवशी वाहनातून येणार्‍या भाविकांना स्वखुशीने कुठेही वाहन लावावे व पुजेच्या किंमतीबाबत प्रबोधन करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या