Wednesday, April 24, 2024
Homeनगरवाणिज्य शाखेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

वाणिज्य शाखेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाणिज्य शाखेतील तृतीय अंतिम वर्षाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी चौघा विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

कार्तिकी रामदास बोधले, शिवा साबळे, सनी कांबळे, गौरव सोनार (सर्व रा. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. याप्रकरणी बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील बाणेश्वर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मच्छिंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे. यातील सनी कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

करोना परिस्थितीने लांबलेल्या पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील कॉस्ट अँड वर्क अकाउंट- 3 या विषयाचा पेपर सुरू होता. बाणेश्वर महाविद्यालयात परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केल्यानंतर कार्तिकी बोधले हीने तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका शिवा साबळे, सनी कांबळे व गौरव सोनार यांनी प्रसारित केली.

वर्गावर पर्यवेक्षक असलेल्या शिक्षिकेच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी कार्तिकी बोधले हिचा मोबाईल तपासला असता व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका आढळली. ही बाब प्राचार्य जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या