Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात लवकरच नियो मेट्रोचा कामाचा शुभारंभ

नाशकात लवकरच नियो मेट्रोचा कामाचा शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशातील पहिली टायरबेस्ड नियो मेट्रो (Tire-based Neo Metro )नाशिकमध्ये होणार असून नाशिककरांच्या याकडे नजरा लागलेल्या आहेत. दरम्यान बहुप्रतिक्षीत नियो मेट्रोचे मार्ग निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच शहरात नियो मेट्रोच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान केद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सितारामण यांनी नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापाठोपाठ महाविकास आघाडी सरकारने देखील एकवीसशे कोटी मदतीची घोषणा केली.

गेल्या वर्षीच या कामाचा शुभारंभ होणार होता. परंतु करोनामुळे नियो मेट्रोच्या कामाला ब्रेक लागल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता नुकतीच नियो मेट्रोसाठी अलायमेंट शासनाकडून (दिशा) ठरवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांनी दिली.

नाशिकरोडपासून ते गंगापूर रोड ( Nashikroad To Gangapur Road )या दरम्यान विविध ठिकाणे ठरवून देण्यात आल्या आहेत. नियो मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यानंतर यापूर्वीच महामेट्रोने डिझाइन, प्रस्तावीत मार्ग महामेट्रोच्या नागपूर येथील तांत्रिक पथकाने नाशकता येउन गेल्या वर्षीच मार्च महिन्यात पाहणी केली होती. तसेच वर्षात एप्रिल व मे महिन्यात टायरबेस्ड मेट्रो प्रकल्पाच्या निविदा काढून कामाला सुरवात केली जाणार होती.

परंतु करोनामुळे या कामाला फटका बसल्याचे बोलले जात होते. या कामावरुन नाशिककरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नियो मेट्रोच्या कामासाठी दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार आहे. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर 10 किमी लांबीचा तर दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिकरोड असा 22 किमी लांबीचा असणार आहे. दरम्यान नियो मेट्रोसाठी आता निश्चित मार्ग तयार झाल्याने लवकरच शहरात या कामाचा शुभारंभ होणार आहे.

नाशिककरांसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार असून याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहे. देशातील पहिला हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड मेट्रो निओ प्रकल्प नाशिकमध्ये साकारला जाणार आहे. गेल्या वर्षीच नाशिक शहरात सिटीलिंक शहर बस सुरु झाली आहे. आता या वाहतूक सेवेपाठोपाठ नियो मेट्रो सेवेत येणार असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळ्कट होणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात 2018 साली घेतलेल्या बैठकीत नाशिकमध्ये मेट्रो चालविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मेट्रो सर्वेक्षणाचे काम सिडको आणि महामेट्रोला देण्यात आले होते. नाशिक शहरात प्रवासी संख्या पाहता शहरात मेट्रो चालवणे शक्य नसल्याने त्याऐवजी एलिव्हेटेड टायरबेस्ड मेट्रो चालवण्याची शिफारस केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या