Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकमातोश्री पाणंद शिवार योजनेच्या १२२ कामांना सुरुवात

मातोश्री पाणंद शिवार योजनेच्या १२२ कामांना सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मातोश्री पाणंद शिवार रस्ते योजनेतून (Panand Shivar Road Scheme) नाशिक जिल्ह्यात (Nashik District) १३५२ योजना मंजूर आहेत. यातील ३२५ कोटी रुपयांच्या (Road) रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून आतापर्यंत १२२ योजनांना सुरुवात झाली आहे. सध्याच्या योजनेतून रस्ते करण्यात अडचणी असल्याने या योजनेच्या अटिशर्ती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते….

- Advertisement -

सध्याच्या योजनेत मजुरांकडून ४० टक्के काम केले जाते, त्याचेप्रमाण कमी करून ते आता १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आमदारांचे प्रयत्न असल्याचे समजते आहे. तर राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme) शेतातून मुख्य रस्त्यापर्यंत शेतमाल आणण्यासाठी मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू केली असून महाविकास आघाडी सरकार असताना आमदारांना खुश करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मातोश्री पानंद शेतशिवार योजना सुरू करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर रस्ते मंजूर करण्यात आले.

या योजनेतून एक किलोमीटर रस्त्यांसाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात येत असून त्यात ४० टक्के काम मजुरांकडून व उर्वरित ६० टक्के काम यंत्राद्वारे करण्यास परवानगी आहे. या योजनेतून मतदारसंघात (Constituency) पाणंद रस्त्यांची कामे मोठया प्रमाणावर होतील या आशेने आमदारांनी रोजगार हमी मंत्र्यांकडे कामांच्या याद्या दिल्या. कामे मंजूर होऊन दोन वर्षे झाली. १२२ कामांना सुरुवात झाली असून या योजनेतील एक किलोमीटर रस्त्याचे काम करण्यासाठी जवळपास ३५०० मनुष्य दिवस काम दाखवावे लागते.

एक जानेवारी २०२३ पासून केंद्र सरकारने मोबाईल अॅपद्वारे मजुरांची दोनवेळा ऑनलाइन हजेरी घेणे बंधनकारक केले आहे. नुकत्याच पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही पानंद योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रमुख्याने शेतकरी या योजनेतील रस्त्यांसाठी जागा देत नसल्याचा मुद्दा चर्चिला गेला. तसेच सध्याच्या योजनेत रस्त्याची रुंदी ३ मीटर धरण्यात येते व शेतकरी एवढी जमीन देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे तीन मीटरच्या रस्त्यांचा हट्ट सोडून कमी रुंदीचे रस्ते करू देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदारांनी केली.

तर या योजनेसाठी जिल्ह्यातील ठेकेदारांचे जवळपास सव्वाशे कोटी रुपये अडकले असून ठेकेदारांचा वाढता दबाव लक्षात घेऊन आमदारांनी या योजनेतील कुशल व अकुशल कामाचे प्रमाण ६०:४० वरून ९०:१० करण्यासाठी दबाव आणणे सुरू केले आहे. तसे झाल्यास एक किलोमीटर पाणंद रस्त्यासाठी केवळ ९०० मनुष्य दिवस दाखवावे लागणार आहे. यामुळे ठेकेदारांना ही कामे करणे सोयीचे होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या