Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : शहरात कोम्बिंग ऑपरेशन

Video : शहरात कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील संघटीत गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या आदेशानूसार शहर पोलीसांनी गुरूवारी (दि.10) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात गुंंडांची धरपकड करत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील, तसेच गुंड व टोळ्यांवर कारवाई सुरू करणार असल्याचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी बुधवारी (दि.9) देशदूच्या संवाद उपक्रमात स्पष्ट केले होते. यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत धडक कारवाई सुरू केली.

शहरातील 38 ठिकाणे निश्चित करून गुरूवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 25 गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 3 पिस्तोल, 11 काडतुसे, 35 तलवारी व चाकू जप्त करण्यात आले आहेत.

या ऑपरेशनमध्ये पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, 42 वरिष्ठ पोलीस निरिक्षक तसेच 543 पुरूष अधिकारी, 120 महिला कर्मचारी यांचा सामावेश होता.

नाशिक शहर पोलीस हद्दीतील संघटीत गुन्हेगारी, टोळया, टोळीयुद्ध असे सर्व संपवण्याच्या दिशेने पोलीसांची वाटलचाल सुरू झाली आहे. पुर्ण यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली असून गुंडावर अधिक कडक कारवाई करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे पोलीस आयुक्त पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या