Friday, April 26, 2024
Homeनाशिकशहर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

शहर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naikan ) यांनी नाशिक शहरातील गुन्हेगारांवर वचक बसावा तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता आयुक्तालयाच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशनची (Combing operation ) सुरवात केली.

- Advertisement -

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसरूळ पोलीस ठाणे,पंचवटी पोलीस ठाणे,उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व्हेलन्स,तडीपार,हिस्ट्रीशीटर,पाहीने,फरार,वारंटमधील व इतर गुन्हेगारांचा शोध घेतला. यामध्ये नाशिक शहर व जिल्हयातुन २१ तडीपार तपासले. त्यापैकी ०३ तडीपार मिळुन आल्याने त्यांचेवर मपोका कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. १८ हिस्ट्रीशीटर गुन्हेगार चेक केले त्यापैकी १० हिस्ट्रीशीटर गुन्हेगार मिळून आले.

संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. अवैध शस्त्राचा शोध घेतला. तसेच गुन्हयात पाहिजे असलेल्या ६ संशयितांना तपासले तसेच बेलेबल/नॉनवेलेबल मधील १० संशयितांना तपासले त्यापैकी ०६ तडीपार मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्यात आली.

एकुण ०९ गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.या कोंबिंग ऑपरेशन मध्ये ०२ सहा. पोलीस आयुक्त, २१ पोलीस अधिकारी, ११० पोलीस अंमलदार तसेच दंगल नियंत्रण पथक, नलद प्रतिसाद पथक यांनी कारवाईत सहभाग घेवुन कॉबिंग ऑपरेशन मोहिम यशस्वीपणे पार पाडले .

- Advertisment -

ताज्या बातम्या