Saturday, April 27, 2024
Homeनगरशिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप स्थगित

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप स्थगित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या (College and University Non-Teaching Staff) विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू असलेले बेमुदत संप (Indefinite Strike) 12 व्या दिवशी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने स्थगित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीचे प्रतिनिधी संतोष कानडे (Santosh Kanade) यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यातील 7 पालिकांमध्ये प्रशासकराज!

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार 18 डिसेंबर पासून महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारींनी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. सदर आंदोलनाची शासनदरबारी दखल घेऊन तातडीने प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासंदर्भात शासननिर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी दिले. तर राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन कृती समितीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासित केल्यानंतर विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांनी बेमुदत काम आंदोलन काही दिवसांकरता स्थगित केले आहे.

1 हजार 143 एसटी कर्मचारी कामावर हजर

त्यामुळे आता विद्यापीठाचे व महाविद्यालयीन कामकाज सुरळीत होऊ शकेल. या संपाचा परिणाम विद्यापीठाच्या व महाविद्यालयीन कामकाजावर झाला. या सर्व पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कृती समितीच्या पदाधिकार्यांची ऑनलाईन बैठक (Online Meeting) घेऊन मागण्या लवकरच मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन दिले. तसे पत्रही उपसचिव यांच्या सहीने काढण्यात आले आहे. त्यानंतर कृती समितीने मंगळवारी रात्री उशीरा बैठक घेऊन संप स्थगित केल्याची घोषणा केली असल्याचे, कानडे (Santosh Kanade) यांनी म्हटले आहे.

घोडेगावात कांदा आवकेत वाढ

- Advertisment -

ताज्या बातम्या