Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

नंदुरबार । प्रतिनिधी- Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याने विविध यंत्रणेतील वरीष्ठ अधिकार्‍यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

- Advertisement -

सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत कार्यवाही करावी.

लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठ्या प्रामाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करावे. लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्थाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.

मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍या व्यक्ती व 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या