Thursday, April 25, 2024
Homeनगरअ‍ॅम्ब्युलन्स, औषधे व साधने ग्रामीण रुग्णालयास उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अ‍ॅम्ब्युलन्स, औषधे व साधने ग्रामीण रुग्णालयास उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यास अ‍ॅम्बुलन्स, आवश्यक ती औषधे व साधने ग्रामीण रुग्णालयास पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ संबंधित

- Advertisement -

कार्यान्वयीन यंत्रणेला आदेश दिले आहेत. यासाठी आ. लहू कानडे यांनी श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात 50 बेडसाठी ऑक्सीजन लाईन टाकण्यासाठी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तात्काळ अनुदान मंजूर करवून दिले आहे .

आ. कानडे यांनी दि. 3 सप्टेंबर 2020 रोजी श्रीरामपूर प्रशासकीय इमारत येथे झालेल्या बैठकीनंतर श्रीरामपूर आरोग्य केंद्रातील 50 बेडचे ऑक्सिजन लाईनचे, व्हेंटिलेटरचे प्रगतीत असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत व श्रीरामपूरमधील सर्व रुग्णांकरिता अ‍ॅम्ब्युलन्स पुरवठा, आवश्यक मुबलक औषधे व उपचाराचे साहित्य श्रीरामपुरातच उपलब्ध करवून देणेबाबत जिल्हाधिकारी यांना कळविले होते.

तदनंतर जिल्हाधिकारी यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन जिल्हा शल्यचिकीत्सक यांना सदरची पूर्तता तात्काळ करणेबाबत दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी पत्र देऊन संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेला आदेशीत केले आहे.तदनंतर जिल्हाधिकारी यांनी तातडीने याबाबत दखल घेऊन संबंधितांना आदेशीत केले आहे.

तसेच सुरू होणार्‍या 50 बेडच्या आरोग्य सुविधा केंद्रास आवश्यक असणारे वैद्यकीय मनुष्यबळ स्थानिक स्तरावर तातडीने उपलब्ध करावे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर यांचेशी आ. कानडे यांची चर्चा केली.

तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्यक्ष भेटून अधिवेशनादरम्यान ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूरसाठी आवश्यक ते मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून देण्याचीही मागणी आ. कानडे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या