Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये !

धुळे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये !

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

राज्यातील पर्जन्यमानाची परिस्थिती, वेधशाळेने वर्तविलेला पावसाचा अंदाज आणि तापी नदीवरील हातनूर धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले आहेत.

- Advertisement -

अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कोणत्याही रजा मंजूर करू नयेत. क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी व कर्मचारी आपापल्या मुख्यालयी थांबतील. कार्यालयस्तरावरील सर्व नियंत्रण कक्ष 24/7 कार्यरत राहतील, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

तसेच अनुपालन अहवाल व पावसाच्या सद्य:स्थितीबाबत वेळोवेळी अवगत करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या