Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसानुग्रह सहाय्यासाठी वेळेत अर्ज करावे; जिल्हाधिकारी गंगाथरन डी

सानुग्रह सहाय्यासाठी वेळेत अर्ज करावे; जिल्हाधिकारी गंगाथरन डी

नाशिक । Nashik

करोना (corona) आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास ५० हजार रूपये सानुग्रह सहाय्य (Sanugrah Sahay) देण्यासाठी शासनस्तरावर योजना राबविण्यात येत असून या आजारामुळे २० मार्च २०२२ पूर्वी मृत्यू झाला असल्यास दिनांक २४ मार्च २०२२ पासून पुढे ६० दिवसांच्या आत तर २० मार्च २०२२ पासून पुढे मृत्यु झाला असल्यास ९० दिवसांच्या आत निकटच्या नातेवाईकांनी या योजनेसाठी अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी (Collector Gangatharan D) यांनी केले आहे…

- Advertisement -

करोना आजाराने मृत्यू झालेल्या जवळच्या नातेवाईकांना आर्थिक (Financial) मदत उपलब्ध व्हावी यासाठी सानुग्रह सहाय्य देण्याची योजना १ डिसेंबर २०२१ पासून ऑनलाईन (ONLINE) पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हास्तरावर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

दरम्यान या,अनुषंगाने ज्या नातेवाईकांना आपले अर्ज (Application) वरील नमुद मुदतीत सादर करता आले नाहीत त्यांचे मुदतीनंतरचे आलेले अर्ज स्वीकारण्यासाठी “गाऱ्हाणे निवारण समिती” (Grievance Redressal Committee) स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत करोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी आपला अर्ज सादर करायचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या