Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरजिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले करोनामुक्त झालेल्या रूग्णांना ‘हे’ आवाहन

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले करोनामुक्त झालेल्या रूग्णांना ‘हे’ आवाहन

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

- Advertisement -

बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान केला तर त्याचा उपयोग गंभीर करोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी होणार आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. तेथील उपचार करणार्‍या डॉक्टरांनीही त्यांचे समुपदेशन करून याचे महत्व पटऊन द्यावे, असेही ते म्हणाले. यासाठी जिल्हा रूग्णालयात आवश्यक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यास अन्न व औषध प्रशासन आणि आयसीएमआर यांनी मान्यता दिल्याचेही ते म्हणाले.

प्लाझ्मा थेरपीमध्ये करोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.

प्लाझ्मा थेरपीमध्ये करोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा करोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.

जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. करोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी करोनाशी लढलेले असतात. जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांनी यासाठी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या