Sunday, May 5, 2024
HomeनगरVideo : करोना लस घेतलेल्यांना किरकोळ त्रास

Video : करोना लस घेतलेल्यांना किरकोळ त्रास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शनिवारी करोना लसीचा डोस घेतलेल्यापैकी चौघांना सौम्य ताप, अंग दुखी, डोके दुखी, मळमळणे सारखी किरकोळ लक्ष दिसून आली.

- Advertisement -

यामुळे नागरिकांनी करोना लसीविषयी घाबरण्याचे कारण नाही. ही सर्व तात्पूर्ती लक्षणे असून एक दिवसांत बरे होतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

करोनावरील लस घेतल्यानंतर नगरमध्ये चार परिचारिका शनिवारी रात्री ते रविवारी सकाळच्या दरम्यान डोकेदुखी, सौम्य ताप, अंगदुखी, उलटी मळमळ अशी किरकोळ लक्षणे आढळली. यातील काही जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात निगरानी खाली ठेवव्यात आले.

वास्तवात जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग हा नॉन कोविडसाठी खुला करण्यात आला असल्याने त्या ठिकाणी किरकोळ लक्षणे असणार्‍या ठेवण्यात आले. यामुळे घाबरण्याचे कारण नसून सर्वांची प्रकृती ठिक असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात 12 केंद्रावर पहिल्या दिवशी लसीकरण करण्यात आले. पहिल्या दिवशी 1 हजार 200 जणांना लस देण्यात येणार होती. प्रत्यक्षात 871 जणांनी उपस्थित राहून लस टोचून घेतली. लसीकरणानंतर संबंधितांना अर्धा तास केंद्रावर ठेवल्यानंतर घरी सोडण्यात आले होते.

यात चौघांना किरकोळ त्रास झाला असून यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या