Friday, April 26, 2024
Homeजळगावतापमान 11 अंशावर; जिल्हा अजून गारठणार

तापमान 11 अंशावर; जिल्हा अजून गारठणार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरणातील गारठा कमालीचा वाढला आहे. दिवसाचे तापमानात देखिल कमालीची घट झाली असून,

- Advertisement -

32 अंशावर असलेले तापमान 27 अंशावर आले आहे, तर रात्रीचे तापमान 11 अंशावर नोंदवले गेले आहे.आगामी सप्ताहात दिवसाचे तापमान 28 ते 32 तर रात्री 11 ते 13 अंशादरम्यान रहाण्याची शक्यता असल्याचे वेलनेस वेदर फाउंडेशनचे हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी म्हटले आहे.

यावर्षी जिल्ह्यात उशीराने हिवाळयाचे आगमन झाले होते. त्यातच डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती.

तर जानेवारीच्या सलग दोन सप्ताहात सकाळी ढगाळ, दुपारी तप्त उन तर सायंकाळनंतर गारठा असे विचित्र वातावरणाचा अनुभव जिल्हावासीयांना अनुभवास आला होता.

दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा गुलाबी थंडीचे आगमन झाले असून गारठा वाढला आहे. जिल्ह्यात कृषी क्षेत्रात बर्‍याच ठिकाणी मोठया प्रमाणावर गव्हाचे पिक पक्व होण्याचा हरबरा यासह मका, ज्वारी (दादर/शाळू) आदी रब्बी वाणांची लागवड झालेली आहे.

रब्बी पिकांना या कालावधीतील थंड वातावरण पोषक असून फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात चोपडा, चाळीसगांवसह सावदा येथे 10 तर अमळनेर, बोदवड, भडगांव, धरणगांव, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, पाचोरा, यावल येथे 11 तर रावेर येथे 12 अंश तापमानाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती हवामान अभ्यासक गोरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या